मुंबई : 'नाव घ्या... नाव घ्या.... आता काय सगळ्यांची नावं घेतो. सगळ्यांची माघार घेतली सांगितलं ना. आपल्यातले काही लोकं ना? याचं नाव घ्या आणि त्याचं नाव घ्या. लग्न बिघ्न आहे का माझं? नाव घ्या नाव घ्या.....', असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्टाइलमध्ये भर सभेत उत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आज सहकार पॅनेलला मार्गदर्शन करायला आले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी मतदान होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल ही निवडणूक लढवत आहे. अजित पवार यांच्यासह 21 पैकी 14 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 7 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात मेळाव्याच आयोजन करण्यात आल होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केलं.
18 वर्षांवरील अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी तो घ्यायला हवा, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन देखील केले. 31 डिसेंबरला बाहेर जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करू नये, घरातच स्वागत करावे, असं म्हणाले.
बंधनं घालायला आम्हाला बरे वाटत नाही. परंतु परिस्थिती अशी उद्भवल्यामुळे काही निर्णय घ्यावे लागतात, अशा शब्दात नागरिकांची समजूत देखील काढली.
मला अनेक कार्यक्रमाची निमंत्रणे येतात. परंतु कार्यकर्त्यांनी भावनेला मुरड घालावी. मी कुठे गेलो की गर्दी होते. मीडिया येतो. नियमांचे उल्लंघन झाले की आमच्यावर कोण खटले भरणार असा प्रश्न विचारला जातो